अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| पशुसंवर्धन विभाग | पशुसंवर्धन विभागाच्या योजना केव्हा राबवल्या जातात ? |
दरवर्षी पशुसंवर्धन खात्यामार्फत व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन लाभार्थी कडून online अर्ज मागविले जातात.
|
2
| पशुसंवर्धन विभाग | पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे करता येतो ? |
दरवर्षी अर्ज मागणी जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याच्याऑनलाईन पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करता येतात.
|
3
| पशुसंवर्धन विभाग | लाभार्थी निवड कश्या पद्धतीने केली जाते ? |
जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत लॉंटरी पद्धतीने ऑनलाईन लाभार्थी निवड केली जाते
|
4
| पशुसंवर्धन विभाग | योजनेचे अनुदान केव्हा व कसे मिळते ? |
योजनेत लाभार्थी निवड झालेनंतर लाभार्थीस कार्यारंभ आदेश दिला जातो ,त्यानंतर योजनेच्या निकषांनुसार खरेदी प्रकिया पार पाडून मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व कागदपत्रे ,दस्तावेज जिल्हा कार्यालयास सादर केल्यानंतर कागदपत्रे तपासणी ,त्रुटीची पूर्तता केलेनंतर अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यावर (DBT) जमा करण्यात येते
|
5
| पशुसंवर्धन विभाग | प्रतीक्षा यादीतील लाभार्थीना लाभ केव्हा मिळतो ? |
लाभार्थी निवड यादीतील एखाद्या लाभार्थीने काही अडचणी मुळे योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला असता प्रतिक्षा यादीतील लाभार्थीना अनुक्रमाने निवड वर्गवारी नुसार लाभ दिला जातो
|
6
| पशुसंवर्धन विभाग | एक लाभार्थी कितीवेळा लाभ घेवू शकतो ? |
एका कुटुंबातील एका व्यक्तीस एका वेळेस एकदाच लाभ दिला जातो
|