अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| बांधकाम विभाग | बांधकाम विभाग योजना अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे मंजूर तरतूद कशी होते? |
प्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार कामासाठी बांधकाम विभागाला तरतूद मंजूर होते.
|
2
| बांधकाम विभाग | पशुसंवर्धन विभागाकडील कामांची तरतूद मंजूर कधी होते? |
प्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार पशुसंवर्धन विभागाकडून कामासाठी बांधकाम विभागाला तरतूद मंजूर होते
|
3
| बांधकाम विभाग | खासदार स्थानिक विकास व आमदार स्थानिक कार्यक्रमांतर्गत कोणती कामे केली जातात? |
स्ते, पुल, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, शाळा कंपाउंड वॉल, समाजमंदिर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह, शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच, सार्वजनिक वाचनालय, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी.
|
4
| बांधकाम विभाग | जन सुविधा योजना अंतर्गत कोणती कामे केली जातात? |
स्मशानभूमी आणि दफनभूमीची उभारणी व देखभाल,अंतर्गत रस्ते आणि पथदिवे,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सार्वजनिक स्वच्छतागृहे,समाजमंदिर आणि सार्वजनिक सभागृह,शाळा आणि अंगणवाडी इमारतींचे बांधकाम व दुरुस्ती.
|
5
| बांधकाम विभाग | गट ब विशेष दुरुस्ती अंतर्गत कोणती कामे केली जातात ? |
रस्त्यांचे खड्डे भरणे रस्त्यांचे मजबुतीकरण खडीच्या पृष्ठभागाचे नूतनीकरण
|