अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | लेक लाडकी योजनेमधून कोण कोणते लाभ देता येतात?
|
१ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा लाभ देता येतो
|
2
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | लेक लाडकी योजनेचा फॉर्म कुठे मिळतो? |
सदर योजनेचा फॉर्म संबंधित गावच्या अंगणवाडी येथे मिळतो
|
3
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | लेक लाडकी योजनेचा लाभ कोणास मिळतो? |
सदर लाभ दोन अपत्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांच्या मुलीस लाभ देता येतो
|
4
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची आत किती आहे? |
सदर लाभ ज्या महिलांचे वार्षिक उत्त्पन्न रु. १००००० च्या आत असणाऱ्या महिलांना देणेत येतो
|
5
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?
|
महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असल्यास सदर योजनेचा लाभ घेता येतो
|
6
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वयाची अट किती आहे?
|
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वयाची अट वय वर्ष २१ ते ६० वर्ष आहे
|
7
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कोठे मिळतो?
|
१) नारीशक्ती दुत अँप वरती २) https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन
|
8
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | पिठाची चक्की या योजनेचा फॉर्म कोठे मिळतो?
|
पिठाची चक्की या योजनेचा फॉर्म आय सी डी एस विभागात मिळतो
|
9
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | पिठाची चक्की या योजनेचा लाभ कोणास मिळतो
|
पिठाची चक्की या योजनेचा लाभ ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न १२०००० च्या आत असणाऱ्या महिलांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो
|
10
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | पिठाची चक्की या योजनेच्या लाभाची रक्कम किती आहे? |
सदर योजनेच्या लाभाची रक्कम रु १०००० आहे व १०% लाभार्थी हिस्सा आहे.
|
11
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | दुग्धजन्य पदार्थ तयार करणे प्रशिक्षण योजनेचा फॉर्म कोठे मिळतो?
|
दुग्धजन्य पदार्थ तयार करणे प्रशिक्षण या योजनेचा फॉर्म आय सी डी एस विभागात मिळतो.
|
12
| एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - शिराळा | दुग्धजन्य पदार्थ तयार करणे प्रशिक्षण या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे?
|
सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता १० वी पास असणे आवश्यक आहे.
|